बेरोजगारीच्या मुद्दयावर 25 मार्चला रामलिला भवन ते संसद भवन मोर्चा 

सोमनाथ केंजळे : रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यासाठी लोकांना समर्थन करण्याचे आवाहन
नगर – शहरातील बहुतांश महाविद्यालयांत, स्पर्धा परीक्षा केंद्रे व शहरातील वस्त्यांमध्ये आम्ही बेरोजगारीच्या मुद्दयावर जनजागृती करून रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यासाठी लोकांना समर्थन करण्याचे आवाहन करत आहोत. यासाठी स्वाक्षरी मोहीमही सुरू आहे. या अभियानाचे रुपांतर 25 मार्चला रामलीला मैदान ते संसद भवन येथील मोर्चात होणार असल्याची माहिती नौजवान भारत सभेचे जिल्हा समन्वयक सोमनाथ केंजळे यांनी दिली.
या मोहिमेत सोमनाथ केंजळे, प्रवीण सोनवणे, अविनाश साठे, आशिष शिंदे, अतुल महारनोर, कुमार भिंगारे, संदीप सकट आदी जण सहभागी आहेत.
लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन आऐगे व दर वर्षी एक कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्‍वासन भाजपतर्फे करण्यात आले होते. साडेतीन वर्षे सत्तेत असूनही बेरोजगारीचा प्रश्‍न सुटत नसल्याने नौजवान भारत सभा, क्रांतिकारी मजदूर मोर्चा व दिशा विद्यार्थी संघटनेने भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायद्यासाठी चलो दिल्लीचे आवाहन करत बेरोजगार व विद्यार्थी जागृतीची मोहीम देशभर सुरू केली आहे.
नगर शहरात नौजवान भारत सभा, क्रांतिकारी मजदूर मोर्चा व दिशा विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. यात माहिती पत्रक वाटप, जनजागृतीपर व्याख्याने, पथनाट्ये आदी प्रकारे ही जनजागृती मोहीम राबविल्या जात आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील युवक दोन दिवस अगोदर रेल्वेने दिल्लीच्या दिशेने जाणार आहेत. नौजवान भारत सभेच्या विविध मागण्यांसाठी केंद्र शासनावर दबाव आणण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. या मोहिमेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ लागले आहेत.
नौजवान भारत सभेच्या मागण्या
कायद्यात रोजगाराचा मूलभूत अधिकारात समावेश करणे, प्रत्येक नागरिकाला वर्षभर रोजगाराची हमी मिळावी, बेरोजगारांना दहा हजार रुपये निर्वाह भत्ता मिळावा, ठेकेदारी प्रथा बंद करावी, अशा नौजवान सभेच्या मागण्या आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)