बेभान “शिवशाही’ चालकांना आवरा

प्रवाशांसह वाहनधारकांची मागणी : अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
सातारा – पगारवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर राज्यभरातील जवळपास सर्वच आगारांमधून “शिवशाही’ नामक नव्या ढाच्याच्या सर्वसोयीनियुक्त एसटी बसेस धावू लागल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेतही “शिवशाही’ रुजू झाली आहे. मात्र, या बसेसचे चालक भलतेच बेभान होऊन “शिवाशाही’ हाकत आहेत. चालकांच्या या बेभानपणामुळे शिवाशाहीच्या अपघातांमध्येही वाढ झाली असून या बेभान चालकांना आवरा, अशी विनंती प्रवाशांसह वाहनधारकांमधून होऊ लागली आहे.

सातारा जिल्ह्याच्या आगारांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या “शिवशाही’ बसेसच्या अपघातांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. या अपघतामध्ये काहींचा बळीदेखील गेला आहे. चालकांच्या बेभानपणामुळेच हे अपघात घडत आहेत. महामागावरुन बस चालवत असताना हे चालक दुसऱ्या वाहनांना कट मारुन सुसाट गाडी चालवत आहेत. विशेषत: दुचाकीस्वारांना या चालकांकडून काडीमोल किंमत दिली जात आहे. समोरुन आलेल्या किंवा आपल्या पुढे चाललेल्या दुचाकीस्वारांना कट मारण्यात या चालकांना विकृत समाधान मिळत आहे की काय? असा सवाल आता वाहनधारकांमधून होऊ लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गत दीड-दोन महिन्यापूर्वी वाढेफाटा ते सातारा शहर या मार्गावर असलेल्या जुन्या आरटीओ चौकानजीक एका पेट्रोलपंपाजवळ एका शिवाशाही बसने एका दुचाकीस्वाराला कट मारला. मात्र, या घटनेत दुचाकीवरील महिला गाडीवरुन पडली आणि जागच्या जागी मृत्यू पावली. एसटी प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचादेखील प्रयत्न झाला. मात्र, पेट्रोल पंपावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, शिवाशाहीच्या चालकांना प्रशासनाने वेळीच आवर घालावा अशी मागणी प्रवाशांसह वाहनधारकांमधून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)