बेबीकॉर्न मकेवर अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील लाखणगाव परिसरातील बेबीकॉर्न मकेवर अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्र (नारायणगाव) आणि सिक्‍सथ ग्रेन यांनी लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.ए
मका (चाऱ्यासाठी, बेबीकॉर्न आणि स्वीटकॉर्न) पिकावर लाखणगाव परिसरात या अळीचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मका पीक मुख्यता: चाऱ्यासाठी घेतले जाते. आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे शेतकरी केरभाऊ गाडगे सांगितले. क्षेत्र सर्वेक्षण करताना लहू पडवळ यांच्या बेबीकॉर्न मका पिकात मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा फैलाव झाल्याचे दिसून आले. परदेशी कंपनीचे महागडे बियाणे घेऊन बेबीकॉर्नची व्यावसाईक रित्या लागवड करणारे बरेच शेतकरी लाखणगाव परिसरात आहेत; परंतु अमेरीकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झाल्याने मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसत असल्याची खंत लहू पडवळ यांनी व्यक्त केली.
याबाबत नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे कृषिकीटक शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी विभागास संयुक्त निवेदन द्यावे. म्हणजे नुकसान भरपाई बाबत कार्यवाही होऊ शकेल.
या लिंकच्या माध्यमातून अगदी कमी कालावधीमध्ये राज्यातील 12हुन अधिक जिल्हातून ऊस, मका आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी माहिती दिली असून त्याचा ऑनलाईन गुगल नकाशा सर्वांना पाहण्यासाठी या लिंकवर उपलब्ध आहे. कृषी सहाय्यक प्रवीण मिरके, सुनील लोहकरे, रामचंद्र गोल्हे, संजय घुले यांनी क्षेत्र पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद केला. अविनाश जांभळे यांनी किडीचे नमुने गोळा केले तर किसन टाव्हरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

  • संस्थेने राज्यातील ऑनलाईन नकाशे तयार केले आहेत. शेतकरी आणि कृषी सहाय्यक यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक सजग राहून सदर आळी दिसताच 02240375791 या टोल फ्री नंबरवर मिसकॉल द्यावा आणि आलेल्या लिंकवर शेतातून फोटो पाठवावेत.
    डॉ. नरेश शेजवळ, संस्थापक कृषिकिंग

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)