बेपत्ता बॅंक अधिकाऱ्याची कार सापडली

कारच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग
मुंबई – मुंबईतील एका खासगी बॅंकेचे उच्चपदस्थ अधिकारी सिद्धार्थ संघवी हे बुधवारपासून बेपत्ता आहेत. तथापी त्यांची कार नव्या मुंबईत बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे आढळून आले. या कारच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. तथापी संघवी यांचा मात्र अजून ठावठिकाणा लागलेला नाही. सीटवर सापडलेल्या रक्ताच्या डागांमुळे त्यांचे काही बरेवाईट झाले असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

ते मलबार हिलवर राहतात. गेल्या बुधवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या बॅंकेच्या कार्यालयात गेले होते पण रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एन. एम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात त्याविषयी तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यांचे व त्यांच्या कारचे वर्णन करणारे संदेश सर्वत्र पाठवल्यानंतर त्यांची ही कार नव्या मुंबईत आढळून आली.

नव्या मुंबईतील कोपरखैरणे भागात त्यांची ही कार सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. आता त्यांच्या शोधाचे प्रयत्न जारी असून त्यासाठी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉड तपासले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)