बेपत्ता झालेला मुलगा अखेर पालकांच्या स्वाधीन

औरंगाबादमधील ऊसतोड कामगाराचा मुलगा कातरखटाव येथून झाला होता बेपत्ता

वडूज – येरळवाडी, ता. खटाव येथे ऊस तोडीसाठी औरंगाबाद येथून आलेल्या कुटुंबातील मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंब अस्वस्थ झाले. मात्र, स्थानिक ग्रामस्थ व पोलीस विभागाच्या निर्भया पथकाच्या मदतीने त्या कुटुंबातील मुलगा परत मिळण्यास मदत झाली. प्रकाश रमेश श्रीसुंदर (मूळ रा. औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे.

प्रकाश हा कुटुंबियांसमवेत कातरखटाव येथे बाजारात खरेदी करण्यासाठी आला होता. गर्दीत तो रस्ता भरकटला. यावेळी कुटुंबातील लोकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कुठे ही सापडत नसल्याने अखेर त्यांनी वडूज पोलिसांत धाव घेतली. कुटुंबातील लोकांनी येरळवाडी येथील असणाऱ्या विहिरी, तलाव, व इतर ठिकाणी शोधाशोध सुरू केली. मात्र, प्रकाश हाती लागत नसल्याने अख्खं कुटुंब चिंताग्रस्त झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, तेथील एका साखर कारखान्यात चिटबॉय म्हणून काम करीत असलेल्या एकाने प्रकाश याच्या नातेवाईकाला तो कराड येथील मलकापूर येथे असल्याचा फोन केला. व तो सुरक्षित असल्याचे ही सांगितले. दरम्यान याबाबत पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकाश यास वडुजला आणण्यासाठी हालचाल सुरू केली.

येळवडीचे सरपंच अनिल चव्हाण व ग्रामस्थ यांच्या बरोबरच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सजगणे,महिला पोलीस कर्मचारी नीलम रासकर, बर्गे, बर्गे यांनी प्रकाश यास वडूज पोलीस ठाण्यात घेऊन आले. अचानक बेपत्ता झालेला प्रकाश सापडल्यानंतर या कुटूंबाने सुटकेचा निःश्‍वास घेतला. यावेळी पोलिसांनी प्रकाश यास कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतर त्याने आपण उसाच्या गाडीतून तिकडे पोहचलो असल्याची माहिती त्याने पोलिसांना व कुटूंबियांना दिली.

12 तासात सापडला प्रकाश
घरच्यांपासून दुरावलेल्या सोळा वर्षांच्या अशिक्षित प्रकाश याच्या कुटुंबाचा रविवारी शोध सुरू होता. मात्र चिटबॉय याच्या सतर्कतेने आणि ग्रामस्थाच्या व निर्भया पथकाच्या कामगिरीने अवघ्या तासात या कुटूंबाला त्यांचा मुलगा परत मिळाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)