बेनामी संपत्ती प्रकरणातून ”किंग खान” आरोपमुक्त

मुंबई  –  बॉलिवूडचा अभिनेता शाहरुखानचे अलिबाग येथील फार्महाऊस आयकर विभागाकडून काही दिवसांपूर्वी  सील करण्यात आले होते. या बेनामी संपत्ती प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याला लवादान दिलासा दिला गेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शाहरुखानने अलिबागमध्ये शेतीसाठी जमीन खरेदी केली होती. परंतु, त्याऐवजी त्याने एक मोठ्ठं फार्महाऊस उभारले. तसेच हा बंगला बनवण्यासाठी शाहरुखने नियमांचे उल्लंघन करत कागदांसोबत छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर होता. यामुळे आयकर विभागाने या फार्महाऊसला विभागाकडून काही दिवसांपूर्वी सील करण्यात आले होते.

दरम्यान शाहरुख अलिबाग येथील संपत्तीवर बेनामी संपत्ती घेवाण-देवाणी अधिनियमांतर्गत अडकला होता. शाहरुखने अलिबागमध्ये शेतीसाठी जमीन खरेदी केली होती. परंतु, त्याऐवजी त्याने एक मोठ्ठं फार्महाऊस उभारले. यामुळे शाहरुखला ९० दिवसांची वेळ देत ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली होती. मात्र शाहरुखला अलिबागमधील मालमत्तेचा लाभार्थी असल्याच्या आरोपांतून त्याची मुक्तता करण्यात आली आहे. मालमत्ता जप्तीची केलेली कारवाई निराधार असल्याचं नमूद करत लवादानं आयकर विभागाला फटकारले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)