बेनामी मालमत्तेवर अंकुश

बेनामी मालमत्तेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आता काही कठोर पावले उचलली जात आहेत. बेनामी मालमत्ता प्राधिकरणाचे अधिकारी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे जी नोटीस पाठवतील, त्यानंतर चौकशीचा फेरा चुकविणे सोपे नाही. नोटीस आल्यानंतर 90 दिवसांच्या कालावधीत त्या मालमत्तेचा वापरही करता येणार नाही. नोटीस बजावल्यानंतर संबंधित मालमत्ता बेनामी नसल्याचे संबंधित व्यक्तीला सिद्ध करावे लागेल. त्यानंतरची कारवाई प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून असेल.

संबंधित मालमत्ता बेनामी असल्याचे अधिकाऱ्यांना वाटल्यास नोटीस पाठविल्यापासून पुढील 90 दिवसांच्या कालावधीपर्यंत ती मालमत्ता मालकापासून वेगळी ठेवली जाईल. काही दिवसांपूर्वी बेनामी मालमत्तेची माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, हे येथे उल्लेखनीय आहे.

-Ads-

– अवंती कारखानीस


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)