बेदाण्यांच्या ई-ऑक्‍शनचे सादरीकरण

पुणे – सांगली बाजार समितीमधील बेदाण्याच्या ई-ऑक्‍शनचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादरीकरण करण्यात आले. नवी दिल्ली येथील किसान उन्नती मेळाव्यातून हे सादरीकरण करण्यात आले.

सांगली बाजार समिती बेदाण्याची राज्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सांगली बाजार समितीमध्ये वर्षाला 500 कोटी रुपयांची बेदाण्याची उलाढाल होते. ई-नाम योजनेच्या पहिल्या टप्प्यात सांगली बाजार समितीची निवड करण्यात आली असून, येथून ई नामची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. सांगली बाजार समितीमध्ये ई-नामअंतर्गत बेदाण्याचे ई-ऑक्‍शन सुरु आहे. सद्यस्थितीत साधारण 25 टक्‍क्‍यांपर्यंत ई-ऑक्‍शन होत आहे. बेदाण्याचे तसेच इतर शेतमालाचे 100 टक्के ई-ऑक्‍शन करण्यासाठी बाजार समितीमार्फत कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने पुसा, नवी दिल्ली येथे 16 ते 19 मार्चदरम्यान किसान उन्नती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात ई-नामची अंमलबजावणी करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणनचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान उन्नती मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी भेट घेण्यात आली. त्यावेळी मेळाव्यातील ई-नाम स्टॉलवर महाराष्ट्र आणि इतर चार राज्यातील प्रत्येकी एका बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या ई-ऑक्‍शनचे व्हिडीओ कॉन्परन्सिंगद्वारे सादरीकरण करण्याबाबत केंद्र शासनाने सूचित केले होते.

त्याप्रमाणे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली बाजार समितीतील बेदाण्याच्या ऑक्‍शनचे व्हिडीओ कॉन्परन्सिंगद्वारे दिल्लीतील मेळाव्यामध्ये सादरीकरण करण्यात आले. सांगली बाजार समितीमधील बेदाण्याचे खरेदीदार, आडते आणि शेतकरी यांनी ई-ऑक्‍शनमध्ये सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)