“बेताल’ भाजपचे “वस्त्रहरण’

संजय राऊत यांचा घणाघात : राम कदमांचा राजीनामा घ्या

पिंपरी – राज्यातील भाजपच्या आमदारांच्या बेताल वक्‍तव्यामुळे भाजपचे वस्त्रहरण झाले आहे. राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम भाजप करत आहे. महिलांना अपशब्द वापरणाऱ्या भाजपचे आमदार राम कदमांनी माफी मागून प्रश्‍न संपणार नसून, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत केला.

मावळमधील पिंपरी, भोसरी, चिंचवड, मावळ या विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित केली होती. यावेळी, राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद गोळवे, योगेश बाबर, गजानन चिंचवडे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले,””महिलांबाबत अपमानास्पद बोलणाऱ्या आमदारांचे विधी मंडळातून तत्काळ निलंबन केले पाहिजे. भाजपला सत्तेचा माज आला असून राज्यातील जनता येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तेशी नशा उतरविणार आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून जनता महागाईने होरपळलेली आहे. तसेच, देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेल्या अवस्थेत आहे. जनतेला “अच्छे दिन’ आणणारे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना राज्यभरात तालुकास्तरावर बैठकी घेण्याचे काम सुरु आहे. शिवसेनेच्या दृष्टीने मावळ मतदार संघ अतिशय महत्वाचा असून त्यावरती लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात शिवसेना स्वबळावर लढणार असून सध्याची परिस्थिती 2014 सारखी नसल्याने येणाऱ्या निवडणुकीत साम, दाम, दंडाचा वापर करुन राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या तरी निवडणुकीला सामोरे जाण्याची शिवसेनेची तयारी झाली आहे. तसेच, भाजप हा संघाच्या मुशीतून तयार झालेला पक्ष आहे. सत्तेसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची वृत्ती भाजपची झाली असल्याचे सांगत, त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

भाजप सत्तेचा गैरवापर करताना दिसत आहे. राज्यभरात ठेकेदारांच्या पैशावर भाजप निवडणुका जिंकत असून जनतेची तिजोरी लुटण्याचे काम त्यांनी केले आहे. राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना देशाची अवस्था जेवढी बिकट होती त्याहून वाईट परिस्थिती भाजपच्या काळात झाली आहे. सध्याच्या काळात राज्याची सत्ता ठेकेदारांच्या हातात आहे.
– संजय राऊत, खासदार, शिवसेना.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)