बेडरूममध्ये काय नसावे?

काही गोष्टी आपल्यापासून दूर ठेवणे खूप कठीण काम असते. कारण त्या वस्तूंशी आपल्याला एक लळा लागलेला असतो. काळानुरूप काही गोष्टी सोडून देणे आवश्‍यक असते. आपल्या स्वतःसाठी ही गोष्ट गरजेची आहे. एखाद दिवशी ठरवून झोपण्याच्या खोलीतून म्हणजे बेडरूममधून काही गोष्टींना अलविदा करा.

जुन्या उशा : कोणत्या उशा टाकून द्यायच्या हे कळण्यासाठी फार काही हुशारी असावी लागते असे नाही. उशी मध्यभागी घडी घालून पाहावी ती पुन्हा आपोआप सरळ झाली नाही तर उशी बदलण्याची वेळ आली आहे असे समजावे. मऊ उशाच वापराव्यात कारण त्यामुळे झोपताना आराम मिळतो.

जुनी पुस्तके : खोलीत अनेक पुस्तके असतात जी वाचून झालेली आहेत किंवा मुलांच्या जुन्या पुस्तकांची कव्हर्स पडून असतील. बहुतांश वेळा बेडरूममध्ये अशी पुस्तके असतात. ही पुस्तके आपण दान देऊ शकता. पुस्तकप्रिय व्यक्ती असलात तर पुस्तके काढून टाकणे शक्‍य नसते मग पुस्तकांची वेगळ्या कपाटाची सोय जरूर करावी.

न वापरते कपडे : कपड्याची कपाटे दर काही कालावधीने स्वच्छ करावी. त्यात काही कपडे असतात जे वापरले जात नाहीत. जे कपडे आपण वापरू शकत नाही ते दुसऱ्यांना देऊन टाका.

जुनी सौंदर्यप्रसाधने : सौंदर्यप्रसाधने देखील विविध प्रकारची असतात. काही संपलेली, काही संपण्याच्या कालावधी जवळ आलेली असतात. ती बदलण्याची गरज असते.

खराब फोन : बेडरूमच्या एका कोपऱ्यात जुने फोन, आयपॉड किंवा मुलांसाठी व्हिडीओ गेम्स इत्यादी पडलेले असतात. ते काढून टाकून अशी कितीशी जागा रिकामी होईल असा विचार मनात येत असला तरीही थोडीशी जागा रिकामी होईलच शिवाय जुन्या फोनमधील रेडिएशनचा धोकाही कमी होईल.

– विजयालक्ष्मी साळवी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)