बेट भागातील बंधारे ठरतात शेतीला वरदान

टाकळी हाजी- यंदा कुकडी आणि घोड प्रकल्प पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने कुकडी, घोड नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहे. त्यामुळे बळीराजा खूश असून कांदा काढून उन्हाळी भाजीपाला पिके घेऊन दुप्पट उत्पन्न मिळविण्याच्या संधीचा फायदा घेत आहे.
शिरुर तालुक्‍यांच्या बेट भागाला वरदान ठरलेल्या कुकडी, घोडनदी तसेच मीना, डिंबा कालव्यामुळे कायमस्वरुपी दुष्काळाचा कलंक पुसून पाण्यांचा सुकाळ झाला आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे कांदा, ऊस पिके जोरदार निघाले असून भावही चांगला मिळाला आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाईचे संकट उभे राहीले होते. शेतकऱ्याचे पिके पाण्याअभावी करपून गेले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सध्या ऐन उन्हाळ्यात पाणी असल्यामुळे कांदा काढलेल्या जमिनीमध्ये मेथी, कोथंबीर, भुईमूग हे पिके घेण्यात शेतकरी व्यस्त झाले आहेत. याबाबत टाकळी हाजीचे प्रगतीशाल शेतकरी शिवाजी कांदळकर म्हणाले, यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला असून सध्या भाव कमी झाले असले तरी साठवणूक केल्यास चांगला भाव मिळणार आहे. सध्या पिंपरखेड, जांबूत परिसरात डांळीब बागा जोरात असून भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. फाकटे येथील बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून तात्काळ दुरुस्ती करावी. अन्यथा पाणी टंचाई निर्माण होऊ शकते, असे सरपंच बारकू वाळूंज आणि उपसरपंच मनेष बोऱ्हाडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)