बेटवस्तीत जनावरांच्या आजाराविषयी मार्गदर्शन

संग्रहित छायाचित्र...

मंचर- निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या आजाराविषयी आणि त्याबाबतच्या लसीकरणाविषयी शेतकऱ्यांना बेटवस्ती येथे मार्गदर्शन करण्यात आले. पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या भुऱ्या, घटसर्प, तसेच लाळ, खुरकत रोगाविषयी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच हे आजार होऊ नयेत म्हणून लसीकरण करण्यात आले. त्यावेळी निरगुडसरमधील विकास अधिकारी डॉ.व्ही. एस. शेरखाने, डॉ. सुरेश टाव्हरे, डॉ. अतुल साबळे, निरगुडसरचे उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे उपस्थित होते. वसंतदादा पाटील कृषी विद्यालय, आंबीच्या कृषी कन्या रिद्धी ढोबळे, आकांक्षा भोईटे, तेजल कदम, भावना कहाणे, वर्षा मरकड, सुषमाजंली मिर्झाला, गायत्री पसुमर्नी या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी कृषी विद्यालयाचे खोब्रागडे, निंबाळकर, खर्डेकर, मोकड, शिंदे, नाइकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)