बेघर कुटुंबियांना “साथ’ची मायेची ऊब

लोणंद : विस्थापित कुटुंबांना ब्लॅंकेटसचे वाटप करताना साथ प्रतिष्ठानचे ऍड. विलायत उर्फ बबलूभाई मणेर, अध्यक्ष कय्युमभाई मुल्ला, नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्यासह मान्यवर. (छाया : प्रशांत ढावरे)

लोणंद, दि. 2 – लोणंद रेल्वे स्टेशन हद्दीतील बेघर वस्ती अतिक्रमणात असल्याने नुकतीच हटविण्यात आली. यामुळे दोनशेहुन अधिक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. ऐन थंडीत उघड्यावर आलेल्या या कुटुंबियांना ब्लॅंकेटसचे वाटप करुन मायेची उब देऊन “साथ’ प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. निमित्त होते साथ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विलायत उर्फ बबलुभाई मणेर यांच्या वाढदिवसाचे. प्रतिष्ठानने दिलेली ही “साथ’ या कुटुंबियांच्या दुखावर फुंकर घालणारी असून समाजासाठी प्रेरणादायी अशीच आहे. प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांमधुनही कौतुक होत आहे.
वाढदिवस म्हटलं की हार-तुरे, बुके, नारळ, केक, फटाके, जेवणावळी असा काही प्रकार समाजामध्ये रुढ होऊ लागला आहे. प्रसिद्धीसाठी वाढदिवसाचे निमित्त करुन अनाठायी खर्च करण्याचा पायंडाच सध्या पडू लागला आहे. मात्र, या सर्व प्रकारला बगल देत लोणंद येथील साथ प्रतिष्ठानने अनोखा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रेल्वे प्रशासनाने नुकतेच लोणंद येथील रेल्वे स्टेशन हद्दीत असणारी बेघर वस्ती हटविली. यामध्ये सुमारे दोनशेहुन अधिक कुटुंबे उघड्यावर आली आहे. ऐन थंडीत घरदार, निवारा गेल्याने या कुटुंबांवर जणू दुख:चा डोंगरच कोसळला आहे. याचीच जाणीव मनात ठेवून लोणंद येथील साथ प्रतिष्ठानने प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ऍड. विलायत उर्फ बबलूभाई मणेर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सर्व विस्थापितांना उबदार ब्लॅंकेटस्‌चे वाटप केले आहे.
साथ प्रतिष्ठानने या विस्थापित कुटुंबियांना केलेले ब्लॅंकटचे वाटप करुन या कुटुंबियांच्या दुख:वर मायेची फुंकरच घातली आहे. “साथ’ने जपलेली ही सामाजिक बांधिलकी समाजासाठी प्रेरणादायी असून साथ प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुकच होत आहे.
याप्रसंगी लोणंद नगरपंचायतचे नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील, उपनगराध्यक्ष किरण पवार, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंतराव शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वास शिरतोडे, मकरंद आबा पतसंस्थेचे तज्ञ संचालक रविंद्र क्षीरसागर, दीपक पारखे, युवा नेते दशरथदादा जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सागर शेळके, खंडाळा तालुका शिवसेना उपप्रमुख संतोष मुसळे, महंमदभाई कच्छी, मनोज ढमाळ आदी मान्यवरांच्या हस्ते उबदार ब्लॅंकेटस्‌ वाटण्यात आले.
या उपक्रमाचे संयोजन साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युमभाई मुल्ला, दीपक बाटे, मंगेश माने, अनिल जगताप, अंजुम मणेर, सुनिल रासकर, गौरव फाळके, अजित घोलप, तात्या मोरे आदी पदाधिकारी सदस्य यांनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)