बेघरांचा प्रश्न 5 एप्रिलच्या बैठकीत मार्गी लागणार

  • – दीपक ताटे : चिंबळी फाटा येथे भापसे पार्टीच्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय महामेळावा

वाकी, दि.30 (वार्ताहर) – राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोटाची खळगी भरण्याकरिता उद्योग पंढरीत दाखल झालेल्या बेघर, भूमिहीन, भाडोत्री नागरिकांना राहण्यासाठी हक्काची एक गुंठा सरकारी जागा मिळण्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले अआहे. या बेघरांचा प्रश्न येत्या 5 एप्रिलच्या बैठकीत मार्गी लागणार आहे, असे संकेत भापसे पार्टीचे पक्षप्रमुख, अध्यक्ष दीपक ताटे यांनी दिले आहेत. चिंबळी फाटा (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या भापसे पार्टीच्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ताटे बोलत होते.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश पंचरास, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री ताटे, जिल्हा सचिव रमेश गालफाडे, समाधान ताटे, धनंजय ताटे, जालिंदर उपाडे, महादेव सुतार, अशोक साबळे, गोविंद गझले, सुरेश कवडे, उत्तम घाडगे आदी यावेळी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील समृद्ध जीवन फुड्‌स इंडिया लिमिटेड कंपनीकडे असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी सरकारने या कंपनीच्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करून पुढाकार घेत या ठेवी आहे त्यांच्या त्यांना परत कराव्यात. मराठवाड्याच्या हक्काचे 272 टीएमसी पाणी सरकारने ताबडतोब मराठवाड्याला देऊन तेथील ग्रामस्थांची तहान भागवावी. मुंबई विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण करून मुंबई विद्यापीठाला महाराजांचे नाव देण्यात यावे. शंभू महादेव साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकीत असलेली बिले या कारखान्याचा लिलाव करून संबंधित बिले शेतकऱ्यांना परत करण्यात यावी. शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या माध्यमातून मराठवाड्यातील हजारो शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची थकीत गुंतवणूक सरकारने पुढाकार घेऊन त्वरित परत करावी. यांसह अन्य मागण्यांबाबत ताटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रकाश पंचरास, जयश्री ताटे, जिल्हा सचिव रमेश गालफाडे आदींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. जालिंदर उपाडे यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)