बेकायदेशीर हॉकर्स झोन वाटपास विरोध

पिंपरी- पिंपरी चिंचवड मनपाकडून शहर फेरीवाला समितीला विश्वासात न घेता दबावापोटी मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याचा, तसेच समितीची मंजुरी न घेता मनपाच्या ब क्षेत्रीय कार्यालयाकडून बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या हॉकर्स झोन वाटप होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे.

या सदंर्भात महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने यां सदंर्भात ब क्षेत्रीय अधिकारी यांना जाब विचारत हॉकर्स झोन वाटप उधळून लावले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, समिती सदस्य विजय शहापुरकर, राजेंद्र वाघचौरे, मनीषा राऊत, प्रवीण कांबळे, हरी भोई, कासीम तांबोळी, अरुणा सुतार, आदींसह हातगाडी टपरी धारक उपस्थित होते. पत्रकात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्‍तांनी शहर फेरीवाला समितीला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने बैठक घेऊन हातगाडी, टपरी धारकांवर दिवसातून दोन वेळा कारवाईचे आदेश दिले व समितीच्या मंजुरी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे आदेश दिले.

-Ads-

त्यानुसार मनपाचे ब क्षेत्रीय कार्यालयाकडून काळेवाडी येथे हॉकर्स झोन वाटपाचे नियोजन केले व कार्यालयात विक्रेत्यांना कोणतीही माहिती न देता चुकीच्या पद्धतीने जागा वाटपाचे आमिष दाखवले, मात्र तेथे आमचा व्यवसाय होणार नाही, ते निर्जन स्थळ असल्याची तक्रार विक्रेत्यांनी महासंघाकडे केली त्यामुळे सदरचे काम बंद पाडले. हॉकर्स झोन वाटपाबाबत योग्य प्रक्रिया पूर्ण न करताच विना आदेश बेकायदेशीर काम सुरु आहे म्हणून मनपाचे इतर कार्यालयास ही महासघांचा तीव्र विरोध राहील, त्यासाठी आंदोलन केले जाईल असे महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी नमूद केले. यावेळी विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते, ही माहिती प्रदेश संघटक अनिल बारवकर यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)