बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी

पिंपरी – शहरात होत असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील 30 सामाजिक, निसर्गप्रेमी संघटनांनी मानवी साखळी केली. निगडीमधील पवळे उड्डाणपुलाखाली झालेल्या या मानवी साखळीमध्ये शहरातील नागरिक व वृक्षप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दैनिक “प्रभात’ने या बेकायदा वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला होता.

मानवी साखळीमध्ये पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, ग्राहक पंचायत पिंपरी-चिंचवड, पिंपरी-चिंचवड शहर विकास मंच, अंघोळीची गोळी, रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडी, शेखर अण्णा युथ फाउंडेशन, स्वामी विवेकानंद जीवन शिक्षण विद्या मंदिर, टाटा मोटर्स कामगार, अभंग शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, भावसार व्हिजन, जलदिंडी प्रतिष्ठान, पवना जलमित्र, दीक्षा एनजीओ, देवराई फाउंडेशन, कै. कैलास तनपुरे फाउंडेशन आदी संघटनांनी सहभाग घेतला.

सर्व संघटनांच्या सदस्यांनी बेकायदेशीर वृक्षतोड जनजागृतीचे फलक घेऊन मानवी साखळी केली. झाडे लावा झाडे जगवा, बेकायदेशीर वृक्ष तोडल्यास एक वर्ष कारावास, बेकायदेशीर वृक्षतोड थांबवा, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा यांसारख्या पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. राज्यभर कोट्यवधी वृक्षांची लागवड करण्यात येणार. वृक्षांच्या संगोपनासाठी विविध उपक्रम, योजना आणि नियम बनवून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु, प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. त्याउलट आहे त्या वृक्षांचाही विनाकारण बळी घेतला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शहरातील यमुनानगर, डांगे चौक आणि अन्य भागात भर दिवसा वृक्षतोड केली जात आहे. निगडी येथील दुर्गा देवी टेकडी उद्यानात महापालिकेने नवीन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालवल्याचा धक्कादायक प्रकार दैनिक “प्रभात’ने नुकताच सचित्र उघडकीस आणला होता. “कुंपणानेच शेत खाण्याचा’ हा प्रकार आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मानवी साखळीद्वारे करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)