बेकायदेशीर लावलेल्या होर्डिंग्सने मेढा विद्रूप

मेढा – शहरात बेकायदेशीर लावलेल्या फ्लेक्‍स होर्डिग्सकडे नगर पंचायत सरळ सरळ दुर्लक्षच करीत आहे. काही नेत्यांच्या, वाढदिवसाचे, सणांचे फलक लावण्यासाठी काही “चमकोगिरींनाच’ घाई असते. वळणावर फलक लावणे बेकायदेशीर असले तरी तेथे हमखास फ्लेक्‍स, लागलेले असतात. अशाप्रकारे नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.

नगरपंचायत सगळी जबाबदारी कंत्राटदारावर सोपवत हात झटकत आहेत. कुठे होर्डिंग्स लावले जात आहेत, कसे लावले आहेत याबाबत माहिती घेण्याचीही तसदी नगरपंचायत घेत नसल्याचे शहरातील नियमबाह्य होर्डिंग्सवरून स्पष्ट होत आहे. काही चमकोंचे दिवाळी शुभेच्छाचे फ्लेक्‍स बेकायदेशीर असल्याचे लक्षात आल्यानंतर काही युवकांनी तक्रार केल्यानंतर काही फ्लेक्‍सबाबत दंड वसूल केला गेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फ्लेक्‍स – होर्डिंग्सच्या दिलेल्या नियमांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. राजकीय पक्षांच्या बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करण्याबाबत कॉंट्रॅक्‍टरवर नेत्यांच्या दबावामुळे किंवा भविष्यातील व्यवसायामुळे कारवाई करण्यात मर्यादा येतात. अनेकदा कारवाई करायलाही धजावत नाहीत. नगरपंचायत सहकार्य पूर्णत: मिळत नसल्यानेच नियमबाह्य फ्लेक्‍स होर्डिंग्सवर अंकुश ठेवता येत नसल्याचे चित्र आहे.

फ्लेक्‍स आणि होर्डिंगचा आकार किती असावा याची निश्‍चित मर्यादा नसल्याची माहिती कंत्राटदार सांगतात. मात्र, फलक लावण्याबाबत नियम असले तरी 80 टक्के फलक परवानगी न घेता लावले जातात. ते आम्ही तातडीने काढून घ्यायला सांगतो परंतु काही दिग्गज चमकोगिरिना फ्लेक्‍स ची परवनगी काढणे अपमानस्पद वाटते.

“स्वच्छ मेढा, सुंदर मेढा’चा टेंभा मिरवणाऱ्या नगरपंचायतला शहर स्वच्छ करता आले नाही, पण सुंदर शहराविषयीच्या मार्गदर्शक सूचनांकडेही लक्ष देता येत नसल्याचेच या फ्लेक्‍स स्पष्ट होत आहे. केवळ नगरपंचायतची कमान आणि रस्ता मोकळा ठेवून भलेमोठे होर्डिंग्स शहरभर सर्रास झळकत आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या फ्लेक्‍स, होर्डिण्गवर अद्याप तरी कडक कारवाईचे शस्त्र हातात घेतले नाही. राजकीय पक्षांच्या स्वघोषित नेत्यांच्या फ्लेक्‍स, होर्डिंग्सने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याबाबत तक्रार केल्यास तक्रारदाराची नाव विचारून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)