बेकायदेशीर फटाका स्टॉल्सवर कारवाईची मागणी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विना परवाना बेकायदेशीर रित्या फटाका स्टॉल्स उभारण्यात आले आहेत, या स्टॉल्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय गणराज्य पार्टीच्या वतीने करण्यात आली.
पार्टीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये फटाका विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारण्यात आले आहेत. यापैकी बुहतेक स्टॉल्स लोकवस्तीच्या भागांमध्ये आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले स्टॉल्सच्या मालक कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता फटाका विक्री करण्यात येत आहे. या फटाका स्टॉल्समध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेला परवाना कुठेही दर्शनी भागात लावण्यात येत नाही. या फटाका स्टॉलमध्ये अग्निरोधक उपकरणांची उपलब्धता नसते. त्याचप्रमाणे असल्यास अगदी नगण्य असते. या फटाका स्टॉलमध्ये अग्निशामक दलाचा परवाना इत्यादी कोणत्याही स्वरुपातील परवाने दर्शनी भागावरती लावलेले नसतात.  केवळ परवान्याच्या बरोबर अटी आणि शर्तीचा कागद जोडलेला असतो. बेकायदेशीर रित्या स्टॉल्स लावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)