बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा अटकेत

पिरंगुट- बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस असा पंचवीस हजार शंभर रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अभिजीत जगन्नाथ काळे (वय 21, रा. दांगट चाळ, शिवणे पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस हवालदार दयानंद लिम्हण यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे जीवन राजगुरू, सुनील बांदल, दिलीप जाधवर, दत्तात्रय जगताप, राजेंद्र चंदनशिव, रवि शिनगारे हे घोटावडेफाटा चौक ते घोटावडे गाव दरम्यान गस्त घालत होते. या दरम्यान एकजण घोटावडेफाटा चौकातील प्राची हॉटेलसमोर उभा असून त्याचाकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने आरोपीची झडती घेतली असता त्याचाजवळ पंचवीस हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस सापडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)