बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा जेरबंद

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 25- बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्यास गुंडा स्कॉड दक्षिण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व एक काडतुस असा 25 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. कुश नंदकुमार पवार (27, रा.कमल आर्केड, तळेगाव दाभाडे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुंडा स्कॉडचे पोलीस निरीक्षक राम राजमाने व त्यांच्या पथकाला कुश चांदणी चौकात शस्त्र घेऊन येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ एक पिस्तुल व एक काडतुस सापडले. त्याच्यावर आर्म ऍक्‍टनुसार कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने दि. 16 एप्रिल रोजी घराशेजारी राहणाऱ्या ओळखीच्या सोन्याच्या दुकानात काम करणारा कारागीर राम सुकुमार कोटाल (27, रा.तळेगाव दाभाडे) याच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळी झाडली होती. यानंतर राम कोटाल याने कुश याच्या सांगण्यावरुन अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध तळेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. हा गुन्हा कुश पवार याने कबूल केला आहे. त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले हत्यार त्याने या गुन्ह्यात वापरले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्‍त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्‍त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्‍त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहायक फौजदार राजेंद्रसिंग चौहान, संजय बरकडे, सुनील चिखले, सर्फराज शेख, प्रशांत पवार, किरण ठवरे, रमेश चौधर, प्रवीण पडवळ, राकेश खुणवे, कैलास साळुंके, विवेक जाधव, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
4 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)