बेकायदा होर्डिंग्ज कारवाईत पालिका, नगरपालिका नापास

न्यायालयाच्या आदेशाची केवळ दहा टक्केच अंमलबजावणी


राज्यातील 350 पालिका, नगरपालिकांचा अहवाल सादर

मुंबई – राज्यातील अनधिकृत पोस्टर्स, होर्डिंग्ज, बॅनर्स हटवून कारवाई करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची अमंलबजावणी करण्यास राज्यातील सर्वच महापालिका, नगरपालिका नापास झाल्या आहेत. आदेशाची केवळ दहा टक्के अंमलबजावणी झाल्याने न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने तिव्र संताप व्यक्त केला. यापुढे पालिका, नगरपालिकांचा बेकायदा होर्डिंग्ज विरोधात कारवाईचा फार्स खपून घेतला जाणार नाही, असे बजाविले.

न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झालेली दिसली नाही तर संबंधीत पालिका, नगरपालिकांच्या मुख्य अधिकाऱ्यांविरोधात अवमान कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराच न्यायालयाने दिला.
बेकायदा होर्डिंग हटविण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही राजकीय पक्षांचे पदाधिकारी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या होर्डिंग्ज, बॅनर्स आणि पोस्टर्स लावतात. या माध्यमातून ही राजकीय मंडळी पालिका नियमावलीचे सरळसरळ उल्लंघन करतात, असा दावा करणारी याचिका सुस्वराज्य फांऊडेशनने ऍड. उदय वारूंजीकर आणि सामाजीक कार्यकर्ते भगवानजी रयानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहेत.

या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए ए सय्यद यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सुमारे 350 पालिका, नगरपालिकांनी कारवाईचा अहवाल सादर केला. हा अहवाल पाहून न्यायालयाने तिव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. केवळ आदेशाची 10 टक्केही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. यापूढे असला प्रकार खपून घेतला जाणार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर पालिका व नगरपालिकांच्या मुख्य अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाचा अवामान केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, अशी तंबी देऊन यापुढे बेकायदा होर्डिंग्ज विरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा, असा आदेशही दिला.

कायदा असल्याने कारवाई नाही
मुंबई, शिर्डी पालिकेने कायद्याने पोस्टर्स, होर्डिंग्ज, बॅनर्सला बंदी असल्याने कारवाई केली नाही, असा अजब अहवाल न्यायालयात सादर केला. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत कायदा असल्याने शिर्डी शहरात एकही पोस्टर्स, होर्डिंग्ज, बॅनर्स नाहीत काय? कायदा आहे म्हणून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करायची नाही का? असा सवाल उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)