बेकायदा हस्तांतरीत जमिनी देवस्थानांच्या होणार नावे

पुणे – राज्यातील देवस्थानच्या जमिनींची तपासणी करण्याच्या सूचना शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरीत झालेल्या देवस्थानच्या जमिनींचे व्यवहार उघड होण्यास मदत होणार आहे. जर बेकायदेशीररित्या जमिनी हस्तांतरीत झाल्या असल्यास अशा जमिनी पूर्ववत देवस्थानच्या नावाने करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.

अंशत: व पूर्णत: सारामाफी असलेल्या देवस्थान जमिनींचे हस्तांतरण बेकायदेशीरपणे किंवा शासनाच्या परवानगीशिवाय होत असल्याच्या बऱ्याच तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचे निदर्शनास आलेल्या प्रकरणांपैकी पूनर्निरिक्षणात दाखल करून घेतलेल्या प्रकरणांपैकी प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे. तसेच ज्या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशा प्रकरणांमध्ये सहा महिन्यांमध्ये अर्ध-न्यायिक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. तसेच त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचबरोबर ज्या देवस्थान जमिनी शासनाने महसूल कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करून ताब्यात घेतल्या असतील अशा जमिनी जोपर्यंत संबंधित देवस्थानला अथवा संबंधित देवस्थानच्या प्रतिनिधीला हस्तांतरीत करीत नाहीत. तोपर्यंत अशा जमिनी शासनाच्या ताब्यात राहतील आणि राज्य शासनाने अशा मालमत्तांना संरक्षण दिले पाहिजे, असे शासनाने म्हटले आहे.

या सर्व कार्यवाहीचा आढावा विभागीय आयुक्त यांनी प्रत्येक महिन्याच्या मासिक आढावा बैठकीत घ्यावा. तसेच सहा महिन्यांच्या कालमर्यादेत याविषयीची कार्यवाही पूर्ण होईल, याची दक्षता देखील घ्यावी, अशा सूचनाही शासनाने विभागीय आयुक्‍तांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)