बेकायदा शस्त्र बाळगणा-याला कोठडी

बेकायदा शस्त्र बाळगणा-या लाकोठडी
पुणे,दि.13 परवाना नसताना पिस्तूल व काडतुसे बाळगल्याप्रकरणी एकास जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. पाटील यांच्या न्यायालयाने दिले आहे.
किरण बबन साळुंखे (34 , रा. शिवशंभो गल्ली, कात्रज-कोंढवा रोड, कात्रज) अशी कोठडी देण्यात आलेल्याचे नाव आहे. तर तरबेज मेहमुद सुतार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुंदन जर्नादन शिंदे (पोलीस, भारती विद्यापीठ) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्याकडे मंगळवारी (12 जून) कात्रज सर्पोद्याना समोरील रस्त्यावर एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे असा एकूण 50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी साळुंखे याला पोलीस कोठढी देण्याची मागणी सरकारी वकील अनंत चौधरी यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)