बेकायदा मंडपांवर काय कारवाई करणार?

हायकोर्टाने दोन दिवसांत माहिती मागवली


मुंबईत 349 तर उपनगरात 217 बेकायदा मंडप

मुंबई – गणेशोत्सवात परवानगी न घेता अनेक मंडळांनी बेकायदा मंडप उभारल्याचे उघड झाल्याने उच्च न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. या बेकायदा मंडपांवर काय कारवाई करणार असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. मुंबई, कोल्हापूर, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा मंडप असून पालिका प्रशासनासह राज्य सरकारनेही याकडे दुर्लक्ष केले असल्याने न्या.अभय ओक आणि न्या.एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाने संताप व्यक्त केला.

न्यायालयाच्या आदेशानंतरही उभारण्यात आलेल्या राज्यातील बेकायदा मंडपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही .त्यांच्या विरोधात काय कारवाई करणार ते दोन दिवसात सांगा, असे न्यायालयाने ठणकावले आणि राज्यातील पालिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

विविध उत्सवांच्या निमित्तीताने होणाऱ्या ध्वनी प्रदुषण आणि रस्त्यावरील बेकायदा मंडपाच्या पार्श्‍वभूमीवरच्या याचिकांवर आज सुनावणी झाली. नाशिक पालिका वगळून मुंबई, पुण्यासह राज्यातील सुमारे 12 पालिकांच्या हद्दीत गणेशोत्सवात उभारण्यात आलेल्या बेकायदा मंडपाचा तपशील राज्य सरकारने न्यायालयात सादर केला.

न्यायालयाने मागील पालिका प्रशासनासह राज्यसरकारने किमान आगामी उत्सवादरम्यान बेकायदा मंडप आढळल्यास संबधितांवर कारवाईचे आदेश दिले असताना बेकायदा मंडप उभारल्याने न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्‍त केले. तर नागपूर, पुणे, संभाजीनगर पालिका हद्दीतल्या बेकायदा मंडपांची यादी न्यायालयाने मागवली. बेकायदा मंडपावर काय कारवाई करणार ते दोन दिवसात सांगा, असा आदेश देऊन याचिकेची सुनावणी 14 सप्टेबरला निश्‍चित केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)