बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक

पिंपरी – पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या कारवाईत दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. तर, त्या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.

किशोर कुशाबा जैद (वय-37, रा. मोरेवस्ती, चिखली), वैभव विद्याधर सरोदे (वय-28, रा. शरदनगर, चिखली), जिग्नेश परशुराम सावंत (वय 27) आणि महेश संभाजी गवारे (वय-22, रा. मोई, ता. खेड) या चौघांना अटक केली आहे.

या घटनेत पथकाने दोन जणांना देहूरोड पोलिसांकडे तर, उर्वरित दोघांना पुढील तपासासाठी खेड पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे. या चौघांपैकी सरोदे याच्यावर पुणे शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे, तर सावंत याच्यावर शहर पोलिसांकडे खून आणि खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चौघांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)