बेकायदा कमिटी बरखास्तीसाठीचे आंदोलन स्थगित

गटविकास अधिकारी आर. डी. काळे यांचेकडून पत्र स्वीकारताना सत्यवान कमाने व जनता क्रांती दलाचे कार्यकर्ते.

वडूज, दि. 5 (प्रतिनिधी) – चितळी, ता. खटाव येथील बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी करण्यात आलेली नियमबाह्य कमिटी बरखास्त करण्याच्या मागणीसाठी सुरू जनता क्रांती दलाने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाईचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आले.

तहसिलदार कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. याबाबत गटविकास अधिकारी आर. डी. काळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन याबाबत लेखी पत्र दिले. ग्रामपंचायतीच्या 2 ऑक्‍टोबरच्या ग्रामसभेतील ठरावानुसार वाळू दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेली नाही. शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार वाळू/रेती निर्गती सुधारीत धोरणानुसार गाव पातळीवर पुर्नगठीत समिती करण्याबाबत सुचना देण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

-Ads-

आंदोलनात दत्ता केंगारे, चांगदेव आवळे, सचिन पाटोळे, निवृत्ती फाळके, कुलदीप इंगळे, विकास सकट, गणेश इंगळे, स्वप्नील डावरे, हेमंत भिसे, राजेंद्र इंगळे, वैभव मदने, राजेंद्र डावरे, प्रतिक डावरे, संजय पुजारी, संभाजी भिसे, सुरज मदने, वैभव मदने, विशाल उमापे आदी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)