बेंजामीन नेतान्याहूंची झाली चौकशी 

जेरूसलेम:  इस्रायलच्या पोलिसांनी पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची दूरसंचार कंपनीसोबत झालेल्या त्यांच्या कथित व्यवहाराबद्दल चौकशी केली आहे. नेतान्याहू यांच्यावर बेजेक टेलिकॉमकडून नियमांमध्ये सूट देण्याच्या बदल्यात कंपनीच्या वृत्तसंकेतस्थळावर स्वतःबद्दल सकारात्मक प्रचार करविल्याचा आरोप झाला आहे.

नेतान्याहू यांनी हा आरोप फेटाळत स्वतःच्या विरोधात राजकीय कट रचण्यात आल्याचा दावा केला. नेतान्याहू यांच्या पत्नी सारा आणि पुत्र याइर यांची देखील बेजेक कंपनीच्या मालकांसोबत असणाऱया संबंधांबद्दल चौकशी होऊ शकते. बेजेकने देखील स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

नेतान्याहू भ्रष्टाचाराच्या 3 प्रकरणांमध्ये अडकले आहेत. या अगोदर दोन प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्यांच्याविरोधात खटला चालविण्याची शिफारस केली आहे. नेतान्याहू यांच्याविरोधातील खटल्याबद्दल इस्रायलचे महाधिवक्ते निर्णय घेणार आहेत. याविषयक निर्णयाला विलंब होऊ शकतो असे मानले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)