बेंगळूरच्या संघाला विजेतेपद

पिंपरी – डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि राट्रॅक्‍ट क्‍लब ऑफ डी. वाय. पी. व्ही. पी. तर्फे आर इवोल्युशन ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये बेंगळूरच्या आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या समीद ए. एम. व श्रेशा भट्ट यांच्या संघाने विजेतेपद पटकाविले.

भारतातील चंदीगड, ग्वालियर, जमशेदपूर, नवसारी, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, पुणे, औरंगाबाद, धुळे, चोपडा, सिंदखेडा , दोंडाईचा, तसेच भारताबाहेर स्पेन, बांग्लादेश, नायजेरिया, अर्जेंटिना, इंडोनेशिया, ब्राझील आणि फ्रान्स येथे स्पर्धेच्या फेऱ्या पार पडल्या. सुमारे अडीच हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. सर्व फेऱ्यांमधून निवडलेल्या अंतिम दीडशे विद्यार्थ्यांची अंतिम फेरी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे पार पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंतिम फेरी ही ग्रुप डिस्कशन, रॅपिड फायर राऊंड, बझर राउंड अशा विविध प्रकारात विभागली होती. अतिशय रोमांचक असलेल्या अंतिम फेरीसाठी पुणे येथील दोन संघ, बेंगळुरू येथील एक संघ व श्रीलंकेतील दोन संघ निवडले होते. या फेरीमधून बेंगुळुरु येथील आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या समीद ए. एम व श्रेशा भट्ट यांच्या संघाला विजेते घोषित करण्यात आले. तर पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या मेकॅनिकल विभागाच्या विनीत मट्टा व श्रेयांश नागदेवते यांच्या संघाने द्वितीय विजेतेपद मिळविले.

प्रा. धीरज अग्रवाल, अमेय पाटील, प्रणव बनकर, श्रावणी खरात, पुष्पराज पटेल, अंकिता उलमाळे, राहुल मुळे, संकेत साळखे, प्राजक्ता गायकवाड, आशुतोष इवले, सचिन औटे, रोहन गवस, आदित्य सिंग, प्रभज्योत चव्हाण, तनय मुरवडे, कमलेश मंडल, अभिषेक यादव, आदिती क्षीरसागर, नीरज बोडखे, अनुराधा सिंग आदींनी स्पर्धेचे संयोजन केले. स्पर्धेचे हे सलग दहावे वर्ष होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)