सोलारिस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धा
पुणे: कोर्णाक इंचेकर, सार्थक पाटणकर, प्रांजल सातपुते व इशिका मेदाणे यांनी चमकदार विजयाची नोंद करताना सोलारिस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील 11 वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सोलारिस क्‍लब यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

तेरा वर्षांखालील मुलींच्या गटांत रिया भालेराव व आचल जैन यांनी अंतिम फेरी गाठली. तर तेरा वर्षांखालील मुलांच्या गटांत वेदांत नातू व ओम होजागे यांनी अंतिम लढतीची निश्‍चिती केली. तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या गटांत भूषण पोतनीस व वरद तळेगांवकर यांनी, तर 17 वर्षांखालील मुलींच्या गटांत श्रेया शेलार व सावनी करमरकर यांनी अंतिम पेरीत धडक मारली.

सोलारिस क्‍लबच्या मयूर कॉलनी येथील बॅडमिंटन कोर्ट येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील 11 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील उपान्त्य फेरीत प्रांजल सातपुते हिने अद्विका कामत हिचा 15-9, 15-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसेच इशिका मेदाणे हिने राधा गाडगीळ हिचा 15-2, 15-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. 11 वर्षांखालील मुलांच्या गटात कोर्णाक इंचेकर याने अक्षय घैसास याचा 15-0, 15-12 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. त्याच्यासमोर सार्थक पाटणकरचे आव्हान आहे. सार्थकने सुदीप खोराटे याचा 15-5, 15-4 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली.

तेरा वर्षांखालील मुलांच्या वेदांत नातू याने देवेश गोएल याचा 15-11, 15-10 असा सहज पराभव केला. तसेच ओम होजागे याने कृष्णा बोरा याचा 15-6, 15-7 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या 17 वर्षांखालील मुलींच्या गटात सावनी करमरकर हिने सानवी राणे हिचा 15-8, 8-15, 15-13 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तसेच श्रेया शेलार हिने सई पळशीकर हिचा 15-5, 15-8 असा पराभव करताना आपली विजयी घौडदौड कायम ठेवली.

सविस्तर निकाल-
मुख्य ड्रॉ- उपान्त्य फेरी- 11 वर्षांखालील मुले- कोर्णाक इंचेकर वि.वि. अक्षय घैसास 15-0, 15-12; सार्थक पाटणकर वि.वि. सुदीप खोराटे 15-5, 15-4;
13 वर्षाखालील मुले- वेदांत नातू वि.वि. देवेश गोएल 15-11, 15-10; ओम होजागे वि.वि. कृष्णा बोरा 15-6, 15-7; 17 वर्षांखालील मुले- भूषण पोतनीस वि.वि. आर्य कुरकुटे 15-8, 15-7; वरद तळेगांवकर वि.वि. सिद्धेश शिंदे 15-7, 2-15, 15-10; 11 वर्षांखालील मुली- प्रांजल सातपुते वि.वि. अव्दविका कामत 15-9, 15-11; इशिका मेदाणे वि.वि. राधा गाडगीळ 15-2, 15-0; 13 वर्षांखालील मुली- रिया भालेराव वि.वि. उदीता बिचाडू 15-11, 15-9; आचल जैन वि.वि. अनन्या देशपांडे 15-5, 15-5; 17 वर्षांखालील मुली- श्रेया शेलार वि.वि. सई पळशीकर 15-5, 15-8;
सावनी करमरकर वि.वि. सानवी राणे 15-8, 8-15, 15-13.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)