बॅडमिंटन स्पर्धा: भूमी वैशंपायन, शर्वा बेंद्रे, देवांश सपकाळ, आर्यन बागल उपान्त्यपूर्व फेरीत

सोलारिस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

पुणे: भूमी वैशंपायन, शर्वा बेद्रे, देवांश सपकाळ व आर्यन बागल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून सोलारिस-रावेतकर करंडक जिल्हास्तरीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील आपापल्या गटातून उपान्त्यपूर्व फेरी गाठली. सोलारिस क्‍लबतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सोलारिस क्‍लबच्या मयूर कॉलनी येथील बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील 13 वर्षांखालील मुलींच्या तिसऱ्या फेरीत भूमी वैशंपायन हिने 0-1 अशा पिछाडीवरून सुरेख खेळ करून पुनरागमन केले. भूमीने खुशी सिंग हिचा 13-15, 15-11, 15-13 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपान्त्यपूर्व फेरीत आगेकूच केली.

याच गटात शर्वा बेंद्रे हिनेदेखील संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली. शर्वाने श्रेया मेहता हिच्याविरुद्ध पहिली गेम गमावल्यावर झुंजार कम बॅक करताना 7-15, 15-14, 15-7 असा विजय मिळवीत उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. तसेच 13 वर्षांखालील मुलींच्या गटांत रिया भालेराव, फाल्गुनी निकुंभ, उदिता बिचाडू, अनया देशपांडे, इशिका मेदाणे आणि आचल जैन यांनीही आकर्षक विजयासह उपान्त्यपूर्व फेरीत आगेकूच केली.

याशिवाय 11 वर्षांखालील मुलांच्या गटात देवांश सपकाळ याने अर्जुन खानविलकर याचा पहिल्या गेमच्या पिछाडीवरून 12-15, 15-6, 15-8 असा संघर्षपूर्ण पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. तसेच आर्यन बागल याने आदित्य पर्वते याचा 15-12, 15-11 असा सरळ गेममध्ये पराभव करून आगेकूच केली. पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटांत मात्र आर्य लेले, सर्वेश होजी, प्रीत ओस्वाल, अर्णव निकम, अनिश सांगविलकर आणि जय पिंपळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर तिसऱ्या फेरीत सरळ गेममध्ये विजयाची नोंद करताना आगेकूच केली.

सविस्तर निकाल-

मुख्य ड्रॉ- 11 वर्षांखालील मुले- तिसरी फेरी- देवांश सपकाळ वि.वि. अर्जुन खानविलकर 12-15, 15-6, 15-8; अक्षय घैसास वि.वि. ईशान महाबळेश्‍वरकर 15-4, 15-9; कोणार्क इंचलकर वि. वि. निलय काळे 15-0, 15-1; आर्यन बागल वि.वि. आदित्य पर्वते 15-12, 15-11;
सुदीप खोराटे वि.वि. ओजस सोत्रे 15-7, 15-8; इशान लागु वि.वि. आर्य देशपांडे 15-9, 15-9; अर्जुन देशपांडे वि.वि. रूहान परब 15-7, 15-8;
सार्थक पाटणकर वि.वि. वेदांत पवार 15-5, 15-4; 13 वर्षांखालील मुली- तिसरी फेरी- रिया भालेराव वि.वि. मृणाल सोनार 15-9, 15-11; फाल्गुनी निकुंभ वि.वि. आदिती देशपांडे 15-3, 15-5; उदीता बिचाडू वि.वि. श्रद्धा पवार 15-2, 15-6; शर्वा बेंद्रे वि.वि. श्रेया मेहता 7-15, 15-14, 15-7;
अनया देशपांडे वि.वि. अंजली तोंडे 15-8, 15-6; भूमी वैशंपायन वि.वि. खुशी सिंग 13-15, 15-11, 15-13; इशिका मेदाणे वि.वि. श्रावणी बेंद्रे 15-10, 15-9; आचल जैन वि.वि. राधा पाठक 15-7, 15-2; 15 वर्षांखालील मुले- तिसरी फेरी- आर्य लेले वि.वि. अनिश मुळे 15-10, 15-10;
सर्वेश होजी वि.वि. कृष्णा बोरा 15-5, 15-9; प्रीत ओस्वाल वि.वि. बिनिश सूद 15-6, 15-6; अर्णव निकम वि.वि. प्रणव गावडे 15-7, 15-14;
अनिश सांगविलकर वि.वि. विराज तळेगांवकर 15-12, 15-5; जय पिंपळे वि.वि. उशांत जोशी 15-14, 15-10.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)