बॅडमिंटन स्पर्धा: पूर्वा बर्वे आणि मालविका बनसोडे उपांत्यपूर्व फेरीत 

सुशांत चिपलकट्टी स्मृती इंडिया इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धा 
पुणे: पुण्याच्या पूर्वा बर्वेसह मालविका बनसोड, आकर्षी कश्‍यप यांनी सुशांत चिपलकट्टी स्मृती इंडिया इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेच्या मुलींच्या एकेरीतून उपांत्यपूर्व फेरी गाठली असून शिवाजीनगरमधील मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्‍समध्ये ही स्पर्धा सुरू आहे.
मुलींच्या एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तिसऱ्या मानांकित पूर्वा बर्वेने इंडोनेशियाच्या डेसिमा ऍक्‍मार सायराफिनावर 21-12, 21-9 अशी सरळ सेटमध्ये मात केली. जवळजवळ अर्धा तास चाललेल्या या लढतीतील पहिल्या गेममध्ये डेसिमाने सुरुवातीला 5-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर पूर्वाने सलग दहा पॉइंट घेत आघाडी मिळविली. त्यानंतर अखेरपर्यंत आघाडी कायम राखत पूर्वाने पहिल्या गेममध्ये बाजी मारली. दुसऱ्या गेममध्येही पूर्वाने डेसिमाला प्रतिकाराची फारशी संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. पूर्वाची आता उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या स्टेफनी विडजाजाशी गाठ पडले. स्टेफनीने त्रिशा ज़लीवर 21-14, 21-15 अशी मात केली.
नागपूरच्या मालविका बनसोडने केयूरा मोपातीवर 18-21, 21-11, 21-12 अशी मात केली. पाउण तास चाललेल्या या लढतीतील पहिल्या गेममध्ये बाजी मारून केयूराने जोरदार सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या गेममध्ये मालविकाने केयूराला एकदाही आघाडी मिळवू न देता बाजी मारली आणि आव्हान राखले. निर्णायक, तिसऱ्या गेममध्येही केयूराला एकदाही आघाडी मिळवू न देता मालविकाने विजयावर शिक्कामोर्तब केले.
चौथ्या मानांकित आकर्षी कश्‍यपने थायलंडच्या पोर्नपिचा चोइकिवॉंगवर 21-14, 21-5 अशी मात केली. मुलांच्या एकेरीत पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्या प्रियांशू राजावतने सनसनाटी विजयाची नोंद केली. प्रियांशूने सिंगापूरच्या वेइ हॉंग लीवर 21-14, 21-18 अशी मात केली आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. वेइला सातवे मानांकन होते.
सहाव्या मानांकित वरुण कपूरला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या योनाथन रामलिएने वरुणवर 23-21, 21-15 अशी मात केली.
पहिल्या फेरीतील निकाल : मुली – पूर्वा बर्वे वि.वि. इनसायरा खान 21-11, 18-21, 23-21; मालविका बनसोड वि. वि. जिया रोंग सि सितो 21-17, 21-10; स्मित तोष्णीवाल वि.वि. आलया रहमा मुलयानी 21-18, 21-12; आकर्षी कश्‍यप वि.वि. पुत्री कुसुमा वार्दानी 21-19, 13-21, 21-16; आतितया पोव्हानन वि.वि वैष्णवी रेड्डी जक्का 19-21, 21-12, 21-17; रिझमा ऍनस्तासी व्हायलेटा वि.वि. खुशी गुप्ता 21-16, 16-21,
चासिनी कोरेपाप वि.वि. आदिती भट 21-10, 21-19; केयूरा मोपाती वि.वि. ईशिता राजू 23-21, 21-17; त्रिशा जॉली वि.वि. रूही राजू 15-21, 21-17, 21-15; अश्विनी भट वि.वि. अमोलिकासिंग सिसोदिया 21-19, 21-14.
मुले – वरुण कपूर वि.वि. रूकेश महार्जन 21-16, 21-14; योनाथन वि.वि. रोहन गुरबानी 20-22, 21-14, 21-14; मेइराबा लुवांग वि.वि. थॅनानन जितजायपुरी 21-8, 21-7; प्रियांशू राजावत वि. वि. आकाश यादव 21-15, 21-9; इख्सान लिओनार्डो इमॅन्युएल रम्बे वि.वि. आलाप मिश्रा 21-14, 21-14.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)