बॅगपॅक करा अन् चालते व्हा अगदी कुठेही…

व्हर्च्युअली जग मुठीत आलंयं. ताजमहाल पहायचाय ना मग तो तर आपण इथेच पाहु शकतो टॅबवर. तोही एका क्‍लिकवर. शिवाय आपण जगायल्या प्रत्येक शहरांची माहिती, व्हिडीओज, इमेजेस सर्व काही थेट पाहु शकतो मग कशाला करायची जीवाची पंचायत. मला ना प्रवासाचा जाम वैताग येतो. कस काही लोक प्रवास करतात कुणास ठाऊक.

वरिल डायलॉग्ज आहेत आजच्या टेक्‍नोसॅव्ही तरुणाईचे. सोशल नेटवर्किंगमुळे खरचं आपण जगणं विसरु पाहत आहोत. भटकंती लाइफ में जरुरी है यार. इरशाद कामील सरांच्या रॉकस्टार सिनेमातील ‘तुम हो’ या गाण्यातील माझ्या फेवरेट लाइन्स आहेत. ‘कहींसे कहीं को भी आओ बेवजह चले’ असे बेमतलब शक्‍यतो एकटेच फिरायला हवं. अनोळखी शहरांमध्ये. फालतुच आपल्या स्वरचित इमेजचं लफडं नसतं. जिथे आपल्याला मनस्वी फिरता येतं. मनाला वाटेल तिथं हवे तितका वेळ थांबता येतं. आपला इगो-बिगो पार कचरा होऊन जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक क्वोट आहे ‘इट्‌स बेटर टु ट्रॅव्हल 10 KM दॅन रिडींग अ बुक’ खरं आहे. प्रवास आपल्याला खुप काही शिकवतो. थ्रिल, अॅडव्हेंचर, जगण्यातली मजा, सेल्फ केअर, नवनवीन लोकांशी ओळखी करणे, त्यांच्याशी सहजपणे जुळवून घेणे, माणसं वाचायला शिकणं, पेशंस वाढविणे, वातावरणाशी-हवामानाशी दोन हात करणे. वय वर्ष 35 पर्यंत जोवर आपण फिटनेसच्या पिक पॉइंटला असू तोपर्यंत तर आपण शक्‍य होईल तेवढे फिरायलाच हवे, कारण आयुष्य एक आहे आणि जग भलं मोठ्ठं.

आपण खरोखर खुप नशिबवान आहोत की आपण भारतासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि विशाल देशात जन्माला आलो. इथे राज्यानुसार भाषा, चालढाल, वेशभूषा, संस्कृती, संगीत, शहररचना, माती, निसर्ग, खाद्यपदार्थ यामध्ये विविधता पहायला मिळते. जगाच सोडा, सध्या आपण आपला देश तरी नक्की फिरायलाच हवा.

‘सिइंग इज बिलिव्हींग’ जोपर्यंत आपण ठराविक प्रदेशांत प्रत्यक्ष जाऊन तिथल्या स्थानिकांच्या भाषा, संस्कृती या गोष्टी समजून घेत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने समृध्द होणार नाही. आपला कम्फर्ट झोन सोडणे हे जरा चॅलेंजिंगच आहे. तो ब्रेक करणे अगदी जीवावर येते. पण दोस्तहो ‘कम्फर्ट झोन एक्‍झिट्‌स ओनली इन माइंड’ सो माणूस कुठेच सुरक्षित नसतो.

वेगवेगळ्या शहरांमधील सुर्यदर्शन, तिथला इतिहास, फुड, स्थळं, वास्तू या गोष्टी मानवी मेंदुला खऱ्या अर्थाने चौकस बनवतात. संकुचित आयुष्याची मर्यादा लाथाडून लावतात. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वृध्दिंगत होतो.

लोकांच्या जगण्याच्या परिभाषा शहरानुसार वेगवेगळ्या असतात. म्हणतात ना ‘कोसा-कोसावर भाषा आणि पाणी बदलते.’ लोकांच्या शैली त्यांच्या सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेत बनलेल्या असतात. भटकंती दरम्यान आपणास या आपसुकच समजत जातात. यातून आपले जिंदगीविषयीचे प्रेम वाढत जाते. आयुष्याच्या शेवटी फक्त आठवणीच शिल्लक राहणार आहेत. आणि अविस्मरणीय अनुभव आपल्याला ट्रॅव्हलिंग मधूनच मिळणार आहेत.

जगण्यात नाविन्यता आणायची आहे तर बिनधास्त फिरा. मग काय बॅगपॅक करा अन् चालते व्हा अगदी कुठेही.

 

 

 

 

सुगतकुमार जोगदंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)