बॅंक कर्मचाऱ्याकडून ग्राहकाची फसवणूक

पिंपरी – येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या कर्मचाऱ्याने एका ग्राहकाची दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

सादीक अजरुद्दीन शेख (वय-20, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी याबाबत फिर्याद दिली असून पिंपरी पोलीस ठाण्यात बॅंक कर्मचारी अक्षय मोहोळ व सुनील शंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांनी 22 नोव्हेंबर रोजी बॅंकेत जाऊन मोहोळ याच्याकडे दोन लाख रुपयांचा धनादेश व स्लीप भरून दिली. यावेळी मोहोळ याने धनादेश व स्लीप स्वतः जवळ ठेऊन घेऊन शेख यांच्या वडिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करतो असे सांगितले. मात्र खात्यावर पैसे आले नाहीत म्हणून विचारणा केली असता सुनील शंकर या इसमाच्या खात्यावर त्याने 2 लाख टाकल्याचे उघड झाले. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)