बॅंक ऑफ महाराष्ट्रला राजभाषेचा सर्वोच्च सन्मान 

पुणे: बॅंक ऑफ महाराष्ट्रला राजभाषा हिन्दीच्या श्रेष्ठ कार्यान्वयन साठी राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान केला गेला.
14 सप्टेंबर, 2018 रोजी हिन्दी दिवसाच्या वेळी विज्ञान भवन, नवी दिल्लीमध्ये आयोजित समारंभात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या हस्ते बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. सी. राऊत यांना हा पुरस्कार दिला गेला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह हे होते. कार्यक्रमास गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहीर, गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू आणि अन्य सन्माननीय व्यक्‍ती उपस्थित होते. यावेळी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक (मा.सं. प्र. व राजभाषा) राजकिरण भोईर, सहाय्यक महाव्यवस्थापक (राजभाषा) डॉ. राजेन्द्र श्रीवास्तव आणि दिल्ली क्षेत्राचे मुख्य व्यवस्थापक (राजभाषा) दिनेश गुप्ता उपस्थित होते. या अगोदरही बॅंकेने विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी केली असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)