जिल्हा ग्राहक मंचाचा दणका : वेतन काढण्यास मनाई

पुणे – वेतनाची रक्कम स्वत:च्या खात्यातून काढण्यास अडवणूक करणाऱ्या बॅंक ऑफ महाराष्ट्राला जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला आहे. ग्राहकाला दिलेल्या दुषीत सेवेकरीता दोन लाख रुपये नूकसान भरपाई 45 दिवसांत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात काम करणाऱ्या मारूती राम भिसे यांनी त्यांचे वेतन खाते असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र बाजीराव रोड शाखेत जून 2016 ते ऑक्‍टोबर 2016 पर्यंतचे वेतन बॅंकेने कोणतीही पूर्वसूचना न देता काढण्यास अडवणूक केली. याप्रकरणाची तक्रार भारतीय ग्राहक संरक्षण समितीकडे करण्यात आली होती. समितीने बॅंकेला प्रत्यक्ष भेट देऊन तसेच लेखी सूचना पत्र पाठवून अडवणूक त्वरीत रद्द करण्यास सांगितली होते. मात्र त्यावरुन बॅंकेने दोन दिवसानंतर केलेली अडवणूक रद्द केल्याचे समितीला लेखी कळवले होते. राम भिसे यांना मिळणारे वेतन हे त्यांच्या कुटूंबाचे एकमेव उदरनिर्वाहाचे साधण होते. बॅंकेने अडवणूक केल्याने त्यांना सहा महिने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे भिसे यांनी डिसेंबर 2016 मध्या अॅड. महेंद्र रा.दलालकर यांच्या मार्फत पुणे ग्राहक मंचात तक्रार केली होती. मंचाचे अध्यक्ष वाय.डी.शिंदे, सदस्य क्षितीजा कुलकर्णी यांनी निकाल दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)