बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या 51 शाखा होणार बंद

पुणे, दि. 3- सार्वजनिक क्षेत्रातील “बॅंक ऑफ महाराष्ट्र’ने आपल्या 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंक क्षेत्रात खर्च कपातीचे धोरण राबवले जात आहे. त्याचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे बॅंकेच्या अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

ज्या शाखा बंद केल्या जाणार आहेत, त्या सर्व शहरी भागातील शाखा आहेत. त्या सर्व शाखा अस्थिर घोषित करण्यात आल्या होत्या. या शाखांवरील खर्चामुळे बॅंकेला मोठा तोटा सहन करावा लागत होता, असे बॅंकेच्या पुण्यातील मुख्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या 51 शाखा कोणत्या हे सांगण्यास मात्र या अधिकाऱ्याने नकार दिला. या 51 शाखा बंद करण्यात आल्या असून तेथील कामकाज शेजारील जवळच्या शाखांमध्ये हलवण्यात आले आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. ग्राहकांच्या सोयीसाठीच या 51 शाखांचे काम जवळच्या अन्य शाखांमध्ये विलीन करण्यात आले आहे. या शाखांचे “आयएफएससी कोड’ आणि “एमआयसीआर कोड’ही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्याकडी जुन्या “आयएफएससी’कोडचे चेकबुक 30 नोव्हेंबरपर्यंत बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

-Ads-

सार्वजनिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील एखाद्या बॅंकेमध्ये इतक्‍या मोठ्या प्रमाणात खर्च कपातीची उपाययोजना होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरात 1,900 शाखा आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)