बॅंक ऑफ बडोदाच्या माजी सीएमडीची चौकशी 

नवी दिल्ली – रोटोमॅक कंपनीने केलेल्या घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने बॅंक ऑफ बडोदाच्या सहा माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यात बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) एम.डी.मल्ल्या आणि व्ही.संथानरामन, आर.के.बक्षी या माजी कार्यकारी संचालकांचा समावेश आहे. रोटोमॅक ग्लोबल प्रा.लि. या कंपनीने बॅंक ऑफ बडोदासह सात राष्ट्रीयीकृत बॅंकांना कर्जाच्या रूपाने तब्बल 2 हजार 919 कोटी रूपयांचा चुना लावला.

पीएनबी घोटाळा करणारे हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांच्याप्रमाणेच रोटोमॅकचा प्रमुख विक्रम कोठारी याने देशाबाहेर पलायन करू नये यासाठी बॅंक ऑफ बडोदाने सीबीआयकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने कोठारीला अटक केली. तो सध्या तुरूंगात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)