बॅंक ऑफ बडोदाची कामगिरी उल्लेखनीय

अकलूज शाखेला उपमहाप्रबंधक आणि रीकव्हरी मॅनेजर यांची भेट

अकलूज- शासनाच्या विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून माळशिरस तालुक्‍यात 325 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करणाऱ्या बॅंक ऑफ बडोदाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत बॅंक ऑफ बडोदाचे पुणे विभागाचे उपमहाप्रबंधक डी. के. पंचोरी यांनी अकलूज येथे व्यक्त केले.
बॅंक ऑफ बडोदाचे उपमहाप्रबंधक पंचोरी व रीकव्हरी मॅनेजर सतीश चापे आदींनी अकलूज येथील बडोदा बॅंकेला भेट देऊन विविध योजनांची सविस्तर माहिती घेऊन, बॅंकेच्या ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि गरजा समजावून घेतल्या.बॅंकेमार्फत दरवर्षी छोट्या-मोठ्या उद्योजकांना, शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज, गृहकर्ज, कारलोन, सुशिक्षित बेरोजगार, मुद्रा असे सुमारे 325 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे कर्ज वाटप केले जाते. अकलूज शाखेचे कर्ज वाटप आणि कर्ज वसुली समाधानकारक असल्याने शाखेतील अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
अकलूज शाखेच्या मुख्य प्रंबधक कविता देशपांडे यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत करून बॅंकेच्या कार्याचा आढावा सांगितला, तर अकलूज शाखेचे सिनिअर मॅंनेजर वैभव सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी वेळापूरचे शाखाधिकारी श्रीकांत पाटील, क्रेडिट मॅनेजर आकीव खान आणि मेहमुद शेख, तसेच कृषी अधिकारी स्वप्नाली शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)