बॅंक ऑफ इंडियाला झाला तब्बल 1156 कोटींचा तोटा 

अलाहाबाद बॅंकेचा तोटाही गेला 1823 कोटी रुपयांवर 

मुंबई: बॅंक ऑफ इंडियाच्या अनुत्पादक मालमत्तेत किरकोळ घट झाली असली तरी दुसऱ्या तिमाहीत बॅंकेला तब्बल 1156 कोटी रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी बॅंकेला 179 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यानंतर मात्र बॅंकेची परिस्थिती अनुत्पादक मालमत्तेमुळे कमालीची बिघडत गेल्याचे
दिसून येते.

बॅंकेने शेअरबाजारांना दिलेल्या माहितीनुसार या तिमाहीत बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता गेल्या वर्षाच्या 16.66 टक्‍क्‍यांवरून या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 16.36 टक्‍क्‍यांवर आली आहे. तर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 8.45 टक्‍क्‍यांवरून 7.64 टक्‍क्‍यांवर आली आहे. बॅंकेला या तिमाहीतही खराब कर्जापोटी 3343 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे.

अलाहाबाद बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार बॅंकेला दुसऱ्या तिमाहीतही तब्बल 1823 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी बॅंकेला या तिमाहीत 70 कोटी रुपयाचा नफा झाला होता. बॅंकेचे ढोबळ एनपीए वाढून आता 17.53 टक्‍क्‍यांवर गेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)