बॅंक्‍स असोसिएशनकडून जयहिंद बॅंकेचा गौरव

पिंपरी – जयहिंद बॅंकेने सन 2017-18 या आर्थिक वर्षात 5 टक्‍क्‍यांपेक्षा कमी ग्रॉस एनपीए ठेवल्याबद्दल पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनच्या वतीने केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन बॅंकेचा नागरी सत्कार करण्यात आला.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी विनोदे यांनी हा सन्मान स्विकारला. महाराष्ट्र राज्याचे पणन व सहकार मंत्री सुभाषराव देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, विद्याधर अनास्कर, बॅंक असेसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष ऍड. साहेबराव टकले, जयहिंद बॅंकेचे उपाध्यक्ष ऍड. अतिश लांडगे, राहुल भोईर, पंडित अल्हाट, देवीदास लोंढे, रूपेश वाघेरे, संभाजी कलाटे, अभिजीत खंदारे, अरूण भुमकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)