बॅंकॉकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागून 20 जण ठार

संग्रहित छायाचित्र

बॅंकॉक (थायलॅंड) – थायलॅंडची राजधानी बॅंकॉक येथे एका बसला लागलेल्या आगीत 20 जण मरण पावल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. बसमध्ये म्यानमारहून आलेले मजूर होते आणि ते फॅक्‍टरीत कामासाठी जात होते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता पोलीसांनी व्यक्‍त केली आहे.

गुरुवारी म्यानमारच्या सोत प्रांतातील 50 मजुरांना घेऊन ही बस सीमाभागातील एका फॅक्‍टरीत जात होती. अचानकपणे चालत्या बसने पेट घेतला. बसमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर पडता न आल्याने 20 मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला. बसने पेट घेण्याचे कारण समजू शकले नाही. बसमधील 27 जणांचे प्राण वाचवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना जवळ्च्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)