बॅंकॉकचा पाकला झटका – मुन्ना झिंगडाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

बॅंकॉक (थायलॅंड) – मुन्ना झिंगडा हा भारताचा नागरिक असल्याचा निर्णय थायलंडमधील एका न्यायालयाने दिल्याने त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बॅंकॉकचा हा पाकिस्तानला मोठाच धक्का आहे. मुन्ना झिंगडा हा डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी आहे. सय्यद हुसेन उर्फ मुन्ना झिंग़डा हा पाकिस्तानचा नाही, तर भारताचा नागरिक आहे. त्याला स्वदेशात परत पाठवावे, असा निर्णय न्यायालयाने दिल्याने त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या नागरिकत्वावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये दीर्घकाळ विवाद चालू आहेत.

दाऊदचा सर्वात मोठा दुष्मन छोटा राजन याच्या खुनाच्या प्रयत्नाबद्दल मुन्ना झिंगडा सन 2000 पासून थायलंडच्या तुरुंगात आहे. मुन्ना झिंगडा हा आपला नागरिक असल्याचा दावा पाकिस्तानही करत आहे. मुन्ना झिंगडाची शिक्षा कमी करण्याचा पाकिस्तानने दोन वेळा थायलॅंडमध्ये गेला होता. तेथे छोटा राजनच्या हत्या प्रयत्नात तो पकडला गेला. मुन्ना झिंगडाचे वडील मुदस्सर हुसेन यांचे नाव 1993 च्या मुंबई बॉंबस्फोट प्रकरणात जोडले गेलेले आहे. पाकिस्तानने मुन्ना झिगडाची शिक्षा दोन वेळा कमी करून घेतली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुन्ना झिंगडा भारताचा नागरिक आहे असा निकाल न्यायालयाने देताच मुन्ना झिंगडाच्या वर्तनात फरक पडला. तो न्यायाधीशांना अपशब्द बोलू लागला. पाकिस्तान दूतावासाचे अधिकारीही आक्रमक बनले.
या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी पाकिस्तानकडे 30 दिवस मुदत आहे. तसे न केल्यास 90 दिवसात मुन्नाला भारतात आणता येईल.

मुन्ना झिंगडाला परत भारतात आणणे हा भारताच्या कूटनीतीचा विजय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)