बॅंकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यास लुटले

पिंपरी – बॅंकेमध्ये रक्कम भरण्यास जाणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यास भर दिवसा डांगे चौक येथे लुचले. ही घटना मंगळवारी (दि. 9) ही घटना घडली.

या प्रकरणी दिलीप नारायण कांबळे (वय-42, रा. फाईव्ह नाईन चौक, येरवडा) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे रेडीयेंट कॅश मॅनेजमेन्ट या खासगी कंपनीत कॅश गोळा करण्याचे काम करतात. कांबळे मंगळवारी नेहमीप्रमाणे चिंचवड परिसरातून कॅश गोळा करून येत त्यांच्याजवळ एक कार आली. कारमधील चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबवण्यास भाग पाडले. कांबळे यांनी दुचाकी थांबवताच कारमधील दोघेजण खाली उतरून त्यांच्या पाठीवरील बॅग आणि खिशातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून घेतला.

कांबळे यांच्याकडे मोबाईल नसल्याने त्यांना कोणालाही संपर्क करता आला नाही. शेवटी त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कारच्या नोंदणी क्रमांकावरून आरोपींच्या शोध सुरु करण्यात आला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)