बॅंका, ऊर्जा आणि दूरसंचार कंपन्या तेजीत 

एचडीएफसी एएमसीचा शेअर उसळला 

एचडीएफसी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एचडीएफसी एएमसी) कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीला गेल्या आठवड्यात 83 पटीनी अधिक प्रतिसाद मिळाला. आज या कंपनीचा शेअरबाजारात नोंदला गेल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या भावात तब्बल 65 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. आयपीओसाठी शेअरचे मूल्य केवळ 1095 ते 1100 रुपये इतके होते. आज या शेअरचे मुल्य एक वेळ 1842 रूपयापर्यंत वाढले होते. नंतर ते 1815 रुपयांवर स्थिरावले. एचडीएफसी एएमसी ही एचडीएफसी आणि स्टॅडर्ड लाईफची संयुक्त कंपनी आहे. या कंपनीने 2800 कोटीच्या उभारणीसाठी आयपीओ बाजारात आणला होता. ही कंपनी 3 लाख कोटी रुपयाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करते. 

मुंबई: निर्देशांक उच्च पातळीवर असूनही संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी चालू असल्यामुळे रोज शेअरबाजार निर्देशांक नव्या उच्चांकी पाळीवर जात आहेत. सोमवारीही शेअरबाजाराचे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले. बॅंका, ऊर्जा आणि दूरसंचार कंपन्यांच्या शेअरची सोमवारी जास्त खरेदी झाल्याचे दिसून आले. सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजारचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.36 टक्‍क्‍यांनी म्हणजे 135 अंकांनी वाढून 37691 अंकावर बंद झाला. मात्र, आज सर्वच कंपन्यांचे शेअर वाढले नाहीत. तर सेन्सेक्‍ससबंधित 30 कंपन्यापैकी केवळ 13 कंपन्याचे शेअर वाढले. हि विषम वाढ आणि निर्देशांकांचे वाढणे हा विश्‍लेषकांच्या दृष्टिकोणातून चिंतेचा विषय झाला आहे. सोमवारी राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 26 अंकांनी वाढून 11387 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक बाजारातून आज नकारत्मक संदेश आले. त्याचबरोबर रुपयाचे मूल्यही स्थिर नव्हते. त्यामुळे शेअरबाजारात दिवसभर खरेदी आणि विक्रीच्या लाटा आल्या. तरीही भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत आज वाढले. काही मोठ्या कंपन्यांनी सादर केलेले नफादायक ताळेबंद त्याचबरोबर बऱ्याच आयपीओंना गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे भारतीय शेअरबाजारातील वातावरण सकारात्मक असल्याचे जीओजी वित्तीय सेवाचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)