बॅंका आणि वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थांनी सायबर सुरक्षेकडे पुरेसे लक्ष द्यावे -उर्जित पटेल

नवी दिल्ली: बॅंका आणि वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थानी ग्राहकांना सवोचे शुल्क माफक स्वरुपात आकारण्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर त्यानी सायबर सुरक्षेकडे निरंतर लक्ष देण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंके चे गव्हर्नर उर्जित पटेल यानी सांगीतले आहे.
ते म्हणाले वित्तीय संस्था ग्राहकांना सेवा कशी देतात याकडे रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष राहणार आहे. बॅंकानी आणि संस्थानी ग्राहकाची तक्रार आल्यास त्यात लक्ष घालून ग्राहकाहचे शंका समाधान करण्यास प्राधान्यक्रम देण्याची गरज असल्याचे त्यानी सांगीतले. ते म्हणाले की, बॅंकानी माहीती तंत्रज्ञानाच्या पायाभूतू सुविधा दर्जेदार असतील याकडे लक्ष द्यावे.
युपीआय 2.0 च्या सादरीकरणावेळी त्यांनी सांगीतले की, आता नेटवर्कचे युग आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणाहुन धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी आपण निरंतर सावध राहण्याची गरज आहे. ग्राकांचा पैसा सुरक्षित ठेववणे हे बॅंकेचे उत्तरदाईत्व आहे. त्यासाठी आकश्‍यक गुंतवणूक आणि मनुष्यबळ विकास करणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगीतले.
ते म्हणाले की, युपीआयमुळे ई- कॉमर्स आणि डिजीटल पेमेंट क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. त्यात आता आणखी सुधारणा करण्यात आली आहे. आगामी काळात भारतात डिजीटल व्यवहाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. त्यासाठी या क्षेत्रात निरंतर संशोधन आणि विकासाची आवश्‍यकता असल्याचे ते म्हणाले. यामुळे भारतातील सर्वाना सुरक्षित डिजीटल व्यवहार कराता येतील आशी आशा त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, डिडीटल पेमेंट क्षेत्रात भारताने योग्य वाटचाल केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने यासाठी सुरुवातीपासून पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर बॅंकानीही ही नवी व्यवस्था उभाण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे हे शक्‍य झाल्याचे त्यांनी सांगीतले ते म्हणलाले की, आता जिल्हा स्तरावरील बॅंकाही डिजीटल व्यवहार सक्षमपणे करु लागल्या आहेत. मात्र सवानीच सायबर सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे. काण त्यामुळे विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न निर्माण होतो असतो असे पटेल म्हणाले.
ते म्हणाले की, आता भारतीाल डिजीटल पेमेंट व्यवस्था विकसित देशातील व्यवस्थाइतकीच कार्यक्षम आणि मजबूत आहे. त्यामुळे अनेक देशाकडून भारतीय व्यवस्थेचे अनुकरण केले जात आहे. आगामी काळातही अश्‍याच पध्तीने वाटचाल राहण्यासाठी रिझर्व्ह बॅंक पूरक वातावरण तयार करणार असल्याचे पटेल यानीं सांगीतले. ते म्हणाले की भारतात इतर देशापेक्षा सायबर गैरव्यवहाराचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)