बॅंकासह पोस्टातही आधार नोंदणी केंद्र सुरू होणार 

कोपरगावात शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश : तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
कोपरगाव – शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थी, पालक यांची प्रवेशासाठीची धांदल सुरू आहे. कोपरगावात एकाच ठिकाणी आधार नोंदणी केंद्र असल्याने अनेकांचा खोळंबा होत आहे. याकामी बॅंकांकडून चालढकल व टोलवाटोलवी सुरू असल्याचे पाहून शिवसेनेचे शहरप्रमुख अस्लम शेख यांनी कार्यकर्त्यांसह नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांना निवेदन दिले. त्यांनी तातडीने बॅंकांसह पोस्टातही आधार नोंदणी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या पाठपुराव्याचे हे मोठे यश असल्याचे शेख म्हणाले.
निवेदनात म्हटले आहे की, बीएसएनएलच्या कार्यालयात एकमेव ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू होते. त्यामुळे अनेकांना ताटकळत राहावे लागत होते. नव्याने आधार कार्ड काढणे किंवा त्यामध्ये बदल करून घेणे, झिरो बॅलन्स बॅंक खाते उघडणे, यासाठी पालक बॅंकांमध्ये गेल्यानंतर ही आमच्याकडे नाही, अशी उत्तरे दिली जातात. तिकडे बघा, येवल्याला जा, इकडे जा, तिकडे जा, अशी टोलवाटोलवी करीत असल्याचा अनुभव आम्ही स्वत: घेतला. थेट विभागीय कार्यालय पुणे येथे वरिष्ठांशी दूरध्वनीवर बोलून हा प्रश्‍न सोडविला. याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली. त्यानंतर तहसीलदारांकडूनच बॅंकांसह पोस्टातही आधार नोंदणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
नायब तहसीलदार सुसरे यांना निवेदन देताना शहरप्रमुख अस्लम शेख, व्यापारी सेना शहराध्यक्ष योगेश मोरे, विभागप्रमुख अशोक कानडे, बाळासाहेब साळुंके, अक्षय वाकचौरे, वसीम शेख, रफिक शेख, अजय पवार, पापा तांबटी, ज्ञानेश्‍वर देवकर, सुनील जगताप, अगुभाई तांबोळी, दिलीप चिंचोले, दीपक निमसे आदींसह शिवसैनीक हजर होते.

..तर बॅंक शाखेला 20 हजाराचा दंड
देशभरातील बॅंकांना आपल्या एकूण शाखांपैकी 10 टक्के शाखांमध्ये आधार नोंदणी केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. बॅंकांनी आधार केंद्र सुरू न केल्यास प्रत्येक शाखेला 20 हजार रुपयांप्रमाणे दंड ठोठावण्यात येणार आहे. या आधार केंद्रांचा फायदा नागरिकांना होणार आहे. त्यामुळे सध्याच्या आधार केंद्रांवर आधार नोंदणीसाठी तासन्‌ तास ताटकळण्यातून त्यांची सुटका होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)