बॅंकांनी ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्यावी

तहसीलदार जयश्री आव्हाड : वडूजमध्ये ग्राहक पंचायतीची बैठक

वडूज – बॅंकांनी खातेदारांचे प्रश्‍न समजून घेऊन त्यांना सन्मानाची वागणुक द्यावी, असे आवाहन तहसिलदार जयश्री आव्हाड यांनी केले. खटाव तहसिल कार्यालयात शासकीय अधिकारी व खटाव तालुका ग्राहक पंचायत यांची बैठक नुकतीच पार पडली.

-Ads-

याप्रसंगी तहसिलदार जयश्री आव्हाड बोलत होत्या. ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी, माजी प्रांत सदस्य यशोधरा पेठे, सिद्धराम गोसावी, पुरवठा विभागाचे शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वडूज येथील आय. डी. बी. आय., बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कराड अर्बन बॅंक, महाराष्ट्र बॅंक आदींची एटीएम सेवा ऐन दिवाळीत विस्कळीत झाल्यामुळे ग्राहकांना त्रास सोसावा लागला. सर्व बॅंकांनी एटीएम सेवा 24 तास उपलब्ध ठेवावी अशी मागणी एकमताने करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या कारभाराचा पाढा वाचण्यात आला. वीज बिलातील वेळोवेळी बदलणाऱ्या स्थिर आकाराबाबत सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते. खटाव तालुक्‍यातील 18 नुतन रेशनकार्ड धारकांना रेशनकार्ड मिळण्यास विलंब होत असल्याबद्दल प्रश्‍न विचारण्यात आला असता त्वरीत स्वाक्षरी करून रेशनकार्ड वितरित करण्यात आली.

यावेळी चैतन्य पुरुषोत्तम इनामदार राहणार वरुड यांना रेशनकार्ड वितरित करण्यात आले. तसेच तहसील कार्यालयासमोर दुचाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था सुनियोजित पद्धतीने करण्याबाबत मागणी करण्यात आली. बैठकीस अनुपस्थित असणाऱ्या अधिकारी वर्गाला कारणे दाखवा नोटीस काढण्याबाबत तहसीलदार जयश्री आव्हाड यांनी आदेश दिला.

पुरवठा विभागाचे श्रीकांत शेंडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी यांनी केले. आभार यशोधरा पेठे यांनी मानले. यावेळी गो. ज. कुलकर्णी, सुभाष घाडगे, अशोक गाडवे, नारायण पाटील, गुरूप्रसाद गोसावी, ग्रीन शुगर सहकारी साखर कारखाना गोपुजचे अधिकारी लावंड, तसेच ग्राहक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)