बॅंकांत घोटाळे वाढत चालले

घोटाळ्यातील रक्‍कम 30 हजार कोटींच्या पुढे वित्तीय स्थिरता अहवालातील माहिती

मुंबई, गेल्या वर्षभरात देशभरातील बॅंकांमध्ये तब्बल 30 हजार कोटी रुपयांचे घोटाळे झाले असल्याची आकडेवारी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात देशभरातील बॅंकांमध्ये साडेसहा हजार घोटाळे झाले आहेत. यातील 85 टक्के घोटाळे सरकारी बॅंकांमध्ये झाल्याची माहिती आरबीआयनेदिली आहे.
आरबीआयने फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट (एफएसआर) प्रसिद्ध केला आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात बॅंकिंग व्यवस्थेतील 6 हजार 500 घोटाळे समोर आले. या घोटाळ्यांचे मूल्य 30 हजार कोटी रुपये इतके होते, अशी आकडेवारी या अहवालात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बॅंकिंग व्यवस्थेत 1 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्यांचं प्रमाण वाढलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकिंग व्यवस्थेतील घोटाळ्यांची संख्याच वाढली नसून घोटाळ्याचं मूल्यदेखील प्रचंड प्रमाणात वाढलं आहे, असं आरबीआयनं अहवालात नमूद केलं आहे. सरकारी बॅंकांमधील घोटाळ्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आरबीआयचा अहवाल सांगतो. एकूण घोटाळ्यांपैकी 85 टक्‍के घोटाळे सरकारी बॅंकांमध्ये झाले आहेत. 2018 मध्ये झालेल्या सर्वाधिक 10 घोटाळे पाहिल्यास, केवळ या 10 घोटाळ्यांमुळे बॅंकांना तब्बल 10 हजार कोटींचा चुना लावण्यात आला आहे. फसवणूक करून घेतल्या जाणाऱ्या कर्जातून सर्वाधिक घोटाळे होतात, असे रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)