बॅंकांच्या परिस्थितीत सुधारणा 

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी असलेला कठीण कालावधी काही प्रमाणात संपत असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. सरकारी बॅंकांच्या वसुली, कामकाजी नफा आणि बुडीत कर्ज रेशो मागील तिमाहीच्या तुलनेत सुधारला असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका या देशाच्या विकासात प्रमुख भूमिका बजावतात. आता वाईट कामगिरीचे दिवस मागे गेले आहेत, असे वित्तीय सेवा सचिव एस. सी. गर्ग यांनी म्हटले. 2018-19 च्या पहिल्या तिमाहीत सरकारी बॅंकांनी 36,551 कोटी रुपयांची वसुली केली. 2017-18 या संपूर्ण वर्षात करण्यात आलेल्या एकूण वसुलीच्या तुलनेत ही रक्‍कम निम्मी आहे.
तिमाहीच्या आधारे बॅंकांचा कामकाजी नफा 11.5 टक्‍क्‍यांनी वाढला, तर तोटा 73.5 टक्‍क्‍यांनी घसरल्याचे त्यांनी म्हटले. 2017-18 च्या शेवटच्या तिमाहीत 21 पैकी 19 सरकारी बॅंकांनी तोटा जाहीर केला होता. 2017-18 च्या शेवटच्या तिमाहीत सरकारी बॅंकांनी एकूण 62,682 कोटी रुपयांचा तोटा जाहीर केला होता, तो 2018-19 च्या पहिल्या तिमाहीत 16,617 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)