बॅंकांच्या नफ्यावर परिणाम होणार

नवी दिल्ली -आता चौथ्या तिमाहीच्या ताळेबंदाचा हंगाम सुरू होणार आहे. इतर क्षेत्राची परिस्थिती काही प्रमाणात सुधारण्याची शक्‍यता असली तरी बॅंकांची परिस्थिती मात्र बिघडण्याची शक्‍यता आहे. एक तर बॅंकांच्या डोक्‍यावर अगोदरचे अनुत्पादक मालमत्तेचे ओझे आहे. त्यातच कर्जाच्या फेररचनेचे सर्व दोर रिझर्व्ह बॅंकेने कापून टाकले आहेत. त्यामुळे आता जे कर्ज वसूल होत नाही त्याची फेररचना करण्याऐवजी त्याचा समावेश अनुत्पादक मालमत्तेत केला जाणार आहे. त्यामुळे चौथ्या तिमाहीत अनुत्पादक मालमत्ता तर वाढणारच आहे. त्याचबरोबर बॅंकांना त्यासाठी मोठी तरतूदही करावी लागणार आहे. त्यामुळे बॅंकांच्या नफ्यावर परिरणाम होणार असल्याचे दिसून येणार आहे.

नफा कमी होण्याचा फटका फक्‍त सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनाच बसणार नाही तर खासगी बॅंकांनाही बसणार आहे. कर्ज फेररचनेच्या नावाखाली एनपीए कमी दाखविल्याची टीका आतापर्यंत बॅंकांवर होत आली आहे. आता सरकार आणि रिझर्व्ह बॅंक कडक भूमिका घेत आहेत. त्यातच अनेक बॅंकांत मोठे गैरव्यवहार झाल्याचे उघड होत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक आणखी कडक भूमिका घेण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्यावरून रिझर्व्ह बॅंक आणि सरकारदरम्यानही बरेच मतभेद असल्याचे बोलले जात आहे. रिझर्व्ह बॅंकेने कर्ज फेररचनेच्या अनेक योजना गुंडाळल्या आहेत. त्यामुळे बॅंकांना आता आपले ताळेबंद स्वच्छ करावे लागणार आहेत. त्याचा दबाव ताळेबंदावर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बॅंकांचे शेअर गेल्या एक महिन्यापासून अस्थिर आहेत.

स्टेट बॅंक आणि पंजाब नॅशनल बॅंक या देशांतील दोन मोठ्या बॅंका आहेत. या दोन्ही बॅंकांनी आगाऊ कर भरणा कमी केला आहे. एवढेच नाही तर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंक आणि ऍक्‍सिस बॅंकेनेही कर भरणा कमी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)